बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 साली आयोजित केलेल्या महामेळाव्याशी संबंधित खटल्याची पुढील सुनावणी 17 जुलै 2025 रोजी ठरवण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी बेळगावमधील JMFC चौथा न्यायालय (137-JMFC IV Court, Belagavi) येथे होणार आहे.या प्रकरणात दीपक दळवी ,दिगंबर यशवंत पाटील, मालोजीराव शांताराम अष्टेकर,मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश अप्पाजी मरगाळे,विकास रत्नाकर कलघटगी या सहा व्यक्तींना आरोपी म्हणून नोंदवले गेले आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम 143, 145, 341, 283, 149 आणि कर्नाटक पोलिस कायदा 1963 च्या कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या खटला “आरोपींचे कलम 313 अंतर्गत निवेदन” या टप्प्यावर आहे.ही कारवाई 9 नोव्हेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आली होती आणि पहिली सुनावणी 2 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडली. ऍड महेश बिर्जे , वैभव कुट्रे खटल्याचे काम पाहत आहेत
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला हा महामेळावा सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी आयोजित केला गेला होता. या पार्श्वभूमीवर हे खटले उभे राहिले.