बेळगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ हॉस्पिटल यांच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत डोळ्यांच्या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर समर्थ नगर येथील श्री एकदंत सांस्कृतिक भवन (५ वा क्रॉस) येथे रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत पार पडले.
या शिबिराला समर्थ नगर, मल्लिकार्जुन नगर व परिसरातील २०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला. तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, आवश्यक त्या नागरिकांना योग्य दरात चष्म्यांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
