बेळगाव : उद्या होणाऱ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा निमित्त राजकुमार शंकरराव मोरे मित्रपरिवार मंडळातर्फे नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत मोर्चाला येणाऱ्या नागरिकांसाठी १,००० टोपी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन विशेषतः महिलांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. ☔👒
हा उपक्रम रमेश पावले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विकास कलघटगी, अंकुश केसरकर, प्राचार्य आनंद आपटेकर, शिवराज सावंत, लक्ष्मण किल्लेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
👉 उपक्रमामुळे मोर्चाला सहभागी होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.