विजयपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना

विजयपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना

विजयपुर : (प्रतिनिधी) : विजयपूर शहरातील गांधी चौक वर्तुळाजवळील टांग स्टँड परिसरात मंगळवार, २ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. डोबेले गल्लीत राहणारा शुभम संकल (वय २१) हा तरुण विद्युत तार वर करण्यासाठी काठीचा उपयोग करत होता. मात्र अचानक तारेला त्याचा स्पर्श होताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसला. शॉक इतका तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत प्रभाकर जंगळे आणि लखन चव्हाण हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीत मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाने तपास सुरू केला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत व्यवस्थेबाबत काटेकोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दुर्दैवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 🙏

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + two =

error: Content is protected !!