बेळगाव : बेंगळूर येथे सुरू असलेल्या कर्नाटका सॉफ्टबॉल प्रीमियर लीग स्पर्धेत “राजा शिवाजी बेळगाव” संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करत विजयी सलामी नोंदवली. धारवाड संघाविरुद्ध झालेल्या या रोमांचक सामन्यात बेळगावच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळी सादर करत सर्वांचा उत्साह दुणावला.
धारवाड संघाने प्रथम फलंदाजी करत ९ षटकांत ८० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र “राजा शिवाजी बेळगाव” संघाने केवळ ५ षटकं ४ चेंडूत ८३ धावा करत विजय मिळवला. बेळगावच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला.
बेळगाव संघाच्या रब्बानी दफेदार याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला “मॅन ऑफ द मॅच” हा पुरस्कार देण्यात आला.
या विजयानंतर संघाचे सर्वत्र कौतुक होत असून, खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
उद्या संध्याकाळी ६ वाजता “राजा शिवाजी बेळगाव” आणि “म्हैसूर महाराजा” यांच्यात सामना रंगणार आहे. सर्व बेळगावकरांच्या शुभेच्छा आपल्या वीर संघासोबत! 💐💪
#Belgav #BedhadakBelgav
