
कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमियर लीग – सिझन २ मध्ये राजा शिवाजी बेळगाव संघाने लीग फेरीत अजिंक्य ठरून गुण तक्त्यावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. संघाने सलग तीन सामने जिंकत अपराजित विक्रम नोंदवला.
बेळगावच्या संघाने यादगिरी योद्धा संघावर तब्बल ५१ धावांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
या सामन्यात संतोष सुळेग पाटील याने अप्रतिम कामगिरी करत मॅन ऑफ द मॅच आणि सुपर स्ट्रायकर हे दोन्ही किताब पटकावले. त्याने केवळ १७ चेंडूत ४२ धावा करत फलंदाजीत चमक दाखवली, तसेच गोलंदाजीत २ षटकांत ११ धावा देत २ बळी घेत प्रतिस्पर्ध्यांना नमवले.
या विजयासह राजा शिवाजी बेळगाव संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला असून पुढील सामना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता चिक्कमंगळूर विरुद्ध होणार आहे.
#Belgav #BedhadakBelgav
