प्रकाशदादा मरगाळे यांचा युवा समितीकडून सत्कार; सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘अखेरचा भीमटोला’ देण्याचे आवाहन

प्रकाशदादा मरगाळे यांचा युवा समितीकडून सत्कार; सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘अखेरचा भीमटोला’ देण्याचे आवाहन

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रकाशदादा मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी हंगिरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील, बाबू कोले, सुहास हुद्दार, विशाल गौंडाडकर, शेखर तळवार, साईनाथ शिरोडकर, विनोद आंबेवाडकर, देसाई सर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष प्रकाशदादा मरगाळे यांनी सात दशके प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन जोमाने प्रयत्न करावेत आणि या लढ्याला अखेरचा भीमटोला द्यावा, असे आवाहन केले. तसेच बेळगाव पत्रकार संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सह्यांच्या मोहिमेला मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ती यशस्वी करावी, असेही त्यांनी नमूद केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 12 =

error: Content is protected !!