बेळगाव : अवघ्या १२ तासांत ११ तोळ्याचे पारंपरिक सोन्याचे गंठण तयार करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम. वेळेची मर्यादा, नक्षीकामाची बारकाई, सोन्याची शुद्धता आणि श्रद्धेची जबाबदारी—या सगळ्यांमुळे हे काम अनेक नामांकित ज्वेलर्सनी नाकारले. मात्र पोतदार ज्वेलर्स, खडेबाजार बेळगाव यांनी हे आव्हान स्वीकारले आणि इतिहास घडवला.
१३७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या पोतदार ज्वेलर्स यांनी उच्च प्रतीचे शुद्ध सोने, अत्यंत कुशल कारागीर आणि उत्कृष्ट नियोजन यांच्या जोरावर अवघ्या १२ तासांत तब्बल ११ तोळ्याचे भव्य व देखणे गंठण तयार करून दिले—तेही कामात कोणतीही तडजोड न करता.
हे खास गंठण चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मालवण येथील कुलदेवीस अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. श्रद्धा, परंपरा आणि सौंदर्य यांचा संगम असलेले हे दागिने म्हणजे पोतदार ज्वेलर्सच्या विश्वासार्हतेची जिवंत साक्ष आहे.
जेव्हा वेळ कमी असते, अपेक्षा मोठ्या असतात आणि गुणवत्ता अत्यावश्यक असते—
तेव्हा बेळगाव विश्वास ठेवतो, पोतदार ज्वेलर्सवर!
परंपरा, गुणवत्ता आणि विश्वासाचे १३७ वर्षे…
पोतदार ज्वेलर्स, खडेबाजार, बेळगाव.
