बेळगाव :
बापट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती कमल मारुती केसरकर (वय ७३) यांचे रविवार, दि. ११ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले, ही बाब समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून नेत्रदानाबाबत माहिती दिली. त्यानंतर मदन बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी समन्वय साधत नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
कमल केसरकर यांच्या नेत्रदानामुळे नेत्रविद्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठा लाभ होणार आहे. ही नेत्रदानाची प्रक्रिया डॉ. नंदेश व डॉ. शरद यांनी पूर्ण केली.
त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, एक कन्या-जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावरचे अंत्यसंस्कार सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १०.३० वाजता सदाशिव नगर स्मशानभूमी येथे होणार आहेत.
