कर्नाटकी पोलिसांची दांडगाई; शुभम शेळकेंवर पाच लाखांचा दंड, जिल्हा सत्र न्यायालयात कारवाईला आव्हान

कर्नाटकी पोलिसांची दांडगाई; शुभम शेळकेंवर पाच लाखांचा दंड, जिल्हा सत्र न्यायालयात कारवाईला आव्हान

कर्नाटकी पोलिसांची दांडगाई; शुभम शेळकेंवर पाच लाखांचा दंड, जिल्हा सत्र न्यायालयात कारवाईला आव्हान

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग अध्यक्ष आणि युवा नेते श्री. शुभम शेळके यांच्याविरुद्ध बेळगाव पोलिसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईने संतापाची लाट उसळली आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या शिफारशीवरून कायदा व सुव्यवस्था विभागाने शुभम शेळके यांच्यावर प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तब्बल पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईविरोधात वकील महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दाखल केले आहे.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, शुभम शेळके यांनी वारंवार पोलिसांच्या सूचना मोडीत काढल्या असून त्यांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १९ गुन्हे दाखल आहेत आणि ते दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करतात. मात्र, ही कारवाई एकतर्फी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.

घटनेचा मागोवा घेतला असता, २६ मार्च २०२५ रोजी शुभम शेळके यांना प्रतिबंधात्मक नोटीस देऊन तुरुंगात पाठविण्यात आले होते. मराठी भाषिकांचा अपमान करणाऱ्या वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा यांच्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून शेळके यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे निषेध व्यक्त केला होता. त्यावरून माळमारुती पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून पाच लाख दंडाची ही तुघलकी नोटीस देण्यात आली.

गेल्या काही दिवसांतच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनाही अशाच नोटीसी देण्यात आल्या आहेत. या सर्व नोटीसींना ऍड. महेश बिर्जे यांनी न्यायालयात आव्हान दिले असून, या कारवाया मराठी नेतृत्व दडपण्याचा सरकारी प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मराठी भाषिकांवरचा हा भाषिक आणि आर्थिक अत्याचार नवीन नसल्याचे सांगून शुभम शेळके म्हणाले, “आमचा लढा लोकशाही मार्गाने सुरू आहे आणि पुढेही राहील. कोणत्याही दबावाला आम्ही झुकणार नाही. मराठी हक्कासाठी आम्ही लढणार आणि जिंकणारच.”

ते पुढे म्हणाले, “कर्नाटक सरकारने आता मराठी कार्यकर्त्यांना आर्थिक भुर्दंडात अडकवण्याचा नवा डाव आखला आहे. मात्र न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आम्ही आमचे उत्तर न्यायालयात देऊ.”

या वेळी ऍड. बाळासाहेब कागणकार, ऍड. एम. बी. बोन्द्रे, ऍड. वैभव कुट्रे, ऍड. अश्वजित चौधरी, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, यल्लप्पा शिंदे, शांताराम होसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभम शेळके यांनी अखेर मराठी जनतेला आवाहन केले की, १ नोव्हेंबरच्या काळ्या दिनी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मितेचा निर्धार दाखवावा.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 17 =

error: Content is protected !!