बेळगाव : शहरात प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची गती वाढवली आहे. २० ऑक्टोबर रोजी बेळगाव शहरातील दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
कोतवाल गल्ली मार्केट पोलीस ठाणे हद्दीतील फारूक अहमद गुलाब अहमद मुल्ला (वय ७५) आणि एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील वैभव नगर येथील कुतुबुद्दीन कशनटी या दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही दुकानांवर छापा टाकून विक्रीसाठी ठेवलेले प्रतिबंधित मांजाचे रोल जप्त केले आहेत.
पतंग उडवताना धारदार मांजाचा वापर केल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना गंभीर दुखापती होण्याच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या दुकानदारांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

