बेळगाव : हेसकॉम (Hubli Electricity Supply Company – HESCOM) तर्फे नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बेळगावातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे. हे काम ११० केव्ही नेहरू नगर व सुवर्णसौध उपकेंद्र तसेच संबंधित ११ केव्ही फीडर लाईन्सवर करण्यात येणार आहे. या कामात लाईन स्ट्रेंथनिंग, उपकरणांची सर्व्हिसिंग आणि इतर तांत्रिक दुरुस्तीचा समावेश आहे.
वीजपुरवठा खंडित होणारे प्रमुख भाग :
इन्डाल, कुमारस्वामी लेआउट, हनुमान नगर, सह्याद्री नगर, के.एल.ई., ऑटो नगर, वैभव नगर, महांतेश नगर, शिवाजी नगर, शिवबसव नगर, आय.सी.एम.आर., सदाशिव नगर, जिनाबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, विश्वेश्वरय्या नगर, सुभाष नगर, नानावाडी, हिंदवाडी, टिळकवाडी, एस.व्ही. कॉलनी, एमईएस/कॅम्प, शाहपूर, जकेरीहोंडा, कपीलेश्वर, श्रीनगर, सिटी फीडर क्षेत्र, मारुती गल्ली, पाटील गल्ली, आझाद नगर, फोर्ट रोड, शेठ्टी गल्ली, धारवाड रोड, माळी गल्ली, शेरी नगर, अंजनेय नगर, अशोक नगर आणि विद्या नगर परिसर यांचा समावेश आहे.
याशिवाय, वादगाव परिसरातील सर्व फीडर्सवर ९ आणि १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. या दरम्यान सुभाष मार्केट, विद्या नगर, भाग्य नगर आणि येळूर रोड परिसरातही वीजपुरवठा बंद राहील.
हेस्कॉमने नागरिकांना विनंती केली आहे की, वीजपुरवठा बंद असताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी व कामादरम्यान सहकार्य करावे. नियोजित वेळेत देखभाल पूर्ण झाल्यानंतर पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
