बेळगाव जिल्हा रुग्णालयात बिम्स मध्ये बनावट डॉक्टर विद्यार्थिनीचा पर्दाफाश

बेळगाव जिल्हा रुग्णालयात बिम्स मध्ये बनावट डॉक्टर विद्यार्थिनीचा पर्दाफाश

बेळगाव, ५ सप्टेंबर २०२५:
बेळगावच्या बीआयएमएस (BIMS) रुग्णालयात तब्बल तीन महिन्यांपासून एक बनावट वैद्यकीय विद्यार्थिनी रुग्णांवर उपचार करत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सना शेख नावाच्या युवतीला रुग्णालयात उपचार करताना पकडण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवारची रहिवासी असलेली सना शेख सध्या बेळगावच्या कुमारस्वामी लेआउटमध्ये वास्तव्यास आहे. तिने स्वतःला एमबीबीएस पदव्युत्तर (PG) विद्यार्थिनी असल्याचे भासवून बीआयएमएसमध्ये विविध विभागांत रुग्णांवर उपचार केले. कधी नर्सिंग विद्यार्थिनी, तर कधी डॉक्टर म्हणून ओळख देत ती सर्जिकल वॉर्ड, ओपीडीसह रुग्णालयाच्या अनेक विभागांत वावरत होती. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी तिची चौकशी केली असता, सना शेखने रुग्णालय संचालकांचे नाव सांगत दडपण आणण्याचाही प्रयत्न केला.

अखेर रुग्णांना उपचार देताना ती सुरक्षा रक्षकांच्या हाती लागली. लगेचच बीआयएमएसचे शल्यचिकित्सक आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर यांच्या समोर तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने स्वतः दुसऱ्या रुग्णालयातही प्रॅक्टिस करत असल्याची कबुली दिली.

या घटनेची गंभीर दखल घेत बीआयएमएसचे संचालक अशोक शेट्टी यांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरण्णा पल्लेड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

👉 बेळगावमधील बीआयएमएस रुग्णालयातील ही मोठी निष्काळजीपणा आणि प्रशासनातील ढिसाळपणा उघड करणारी घटना ठरली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!