खानापूर तालुक्यातील घोटगाळी गावची रहिवासी आणि हलशी येथील शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी निशा नारायण पाटील हिने राज्यस्तरीय जूडो स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले आहे.
निशाने अथक परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि तीव्र स्पर्धात्मक वृत्तीच्या बळावर हे यश मिळवले असून, तिच्या या यशामुळे खानापूर तालुका, हलसी परिसर आणि तिचे विद्यालय गौरवले गेले आहे.
तिच्या या घवघवीत यशाचे तिचे शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. निशाने आपल्या क्रीडा कौशल्यातून संपूर्ण तालुक्याला अभिमानाचा क्षण दिला आहे.
ही यशोगाथा तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. निशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!