मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूरमध्ये जाहीर सभा; नंदकुमार गोरुले करणार मार्गदर्शन

मराठी सन्मान यात्रेला येळ्ळूरमध्ये जाहीर सभा; नंदकुमार गोरुले करणार मार्गदर्शन

बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून येत्या 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने ‘मराठी सन्मान यात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता राजहंसगड येथून या यात्रेला प्रारंभ होणार असून सीमाभागातील विविध गावांतून ती मार्गक्रमण करणार आहे.

ही यात्रा राजहंसगड येथून सुळगे (ये), येळ्ळूर, अवचारहट्टी मार्गे धामणे येथे जाईल. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गे परत येत येळ्ळूर गावात फेरी काढण्यात येणार असून सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांची तब्बल 12 वर्षे निष्ठेने सेवा केलेले शिवसैनिक नंदकुमार गोरुले हे संबोधित करणार आहेत. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले गोरुले हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, दिग्दर्शक, कवी व कलाकार म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.

आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती नंदकुमार गोरुले यांच्याकडून मिळाल्याचा उल्लेख आपल्या मुलाखतीत केला होता.

बेळगावच्या सीमाभागाशी आणि मराठी माणसांशी गोरुले यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांच्या भाषणाबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे. मराठी अस्मिता आणि सीमावासीयांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी ही सभा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करावी, असे आवाहन युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =

error: Content is protected !!