समर्थनगरातील रस्ते-ड्रेनेज समस्यांबाबत आमदार आसिफ (राजु) सेठ यांची पाहणी

समर्थनगरातील रस्ते-ड्रेनेज समस्यांबाबत आमदार आसिफ (राजु) सेठ यांची पाहणी

बेळगाव :
समर्थनगर परिसरातील रस्ते, गटारी व ड्रेनेजच्या समस्यांबाबत आज मंगळवार, दि. २० रोजी आमदार आसिफ (राजु) सेठ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या समोर मांडल्या. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले.

समर्थनगरातील रहिवाशांनी मागील आठवड्यात आमदार सेठ यांची भेट घेऊन परिसरातील रस्ते, ड्रेनेज व गटारांच्या अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने आज आमदार सेठ यांनी तातडीने या भागाला भेट देत पाहणी केली.

या पाहणीदरम्यान महापालिका, हेस्कॉम, एल अँड टी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सध्या या भागात रस्ते, ड्रेनेज व गटारांची अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी रहिवासी नागरिकांनी केली.

यावेळी आमदार आसिफ (राजु) सेठ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या समस्यांबाबत आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान बळीराम गौडा, काशी हिरेमठ, पवन शिरोडकर, दत्तुसिंग नगरकर, तुकाराम गौडा, चेतन कदम, मनोज तानवडे, विठ्ठल कटारे, गजानन यरझरी, मारुती तावरे, राजू हलगेकर तसेच परिसरातील महिला रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − nine =

error: Content is protected !!