बेळगांव :
मित्रा फौंडेशन, बेळगांव यांच्या वतीने “उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा” दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महिला विद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बेळगांव तालुक्यातील मराठी माध्यमातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असेल.
स्पर्धेचे स्वरूप विशेष असून, स्पर्धकांनी चिठ्ठी काढून त्यात आलेल्या विषयावर अचूक पाच मिनिटे बोलायचे आहे. वक्तृत्व, विचारांची मांडणी आणि भाषणातील आत्मविश्वास यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे.
स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत :
- १ले बक्षीस : ₹ 5000
- २रे बक्षीस : ₹ 3500
- ३रे बक्षीस : ₹ 2500
- तसेच चार उत्तेजनार्थ बक्षिसे : प्रत्येकी ₹ 1000
आजकाल विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती घटत चालली असल्याने, ती पुन्हा जोमाने वाढावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9449225445
