हुबळी : (प्रतिनिधी)धारवाड जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव व क्रीडा संघटना आणि पंचमुखी हनुमान कमिटी, हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत दावणगेरीच्या राहुल मेहरवाडेने मानाचा ‘मिस्टर कर्नाटक बजरंगी – 2025’ किताब पटकावला. बेळगावचा रोनक गवस उपविजेता ठरला, तर उमेश गंगणे ‘बेस्ट पोझर’चा मानकरी ठरला.
हुबळीतील बजरंगी ग्राउंडवर पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत तब्बल 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाला डॉ. सुनील रेवणकर, बलराम दोडमणी, मल्लय्या हिरेमठ, विनोद पाटील, डॉ. अभिषेक पाटील, सीपीआय जयवंत गवळी, शरीफ मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, शरीफ मुल्ला, रमेश शेट्टी, एस. एस. तावडे आणि इंद्रीस यांनी काम पहिले. तर स्टेज मार्शलची जबाबदारी जावेद नायकर, उमेश रणदिवे, भारत बाळेकुंद्री, राजू पाटील, श्रीराम व मोहम्मद यांनी निभावली.
पुरुषांसाठी घेण्यात आलेल्या विविध 7 वजनी गटांतील पहिल्या पाच क्रमांकाचे गटवार निकाल पुढीलप्रमाणे :
55 किलो गट : सलमान खान (शिमोगा), सुमंत कुंभार (धारवाड), गौस पाक (धारवाड), खाजा एम.एस. (धारवाड), पांडुरंग गुरव (बेळगाव).
60 किलो गट : साजिद बशेर (हरिहर), ज्योतिबा पाटील (बेळगाव), प्रभू चौगुले (बेळगाव), ओमकार गवस (बेळगाव), तुषार गावडे (बेळगाव).
65 किलो गट : रोनक गवस (बेळगाव), नागेश सी. (बेळगाव), स्टेफन दास (धारवाड), चेतन वाली (धारवाड), तेजस जाधव (बेळगाव).
70 किलो गट : अली नदाफ (बागलकोट), बसप्पा कोणकेरी (बेळगाव), मलिक रेहान काझी (धारवाड), युवराज राक्षे (बेळगाव), रियाज खान (बेळगाव).
75 किलो गट : राहुल मेहरवाडे (दावणगेरी), गणेश बंगेरा (मंगळूर), आकाश डी. (दावणगेरी), संतोष कुमार (धारवाड), किरण आर. (दावणगेरी).
80 किलो गट : चेतन ताशिलदार (बेळगाव), शिवाप्पा एन. (बागलकोट), मारुती एस. (हुबळी), मुस्ताक अलगार (विजापूर), मनीष एस. (बेळगाव).
80 किलोपेक्षा जास्त गट : अनिल बी. (गदग), अब्बास अली संदलवाले (धारवाड), प्रवीण कणबरकर (बेळगाव), श्रीमेश खन्नुकर (बेळगाव), दिग्विजय पाटील (बेळगाव).
टायटल विनर : राहुल मेहरवाडे (दावणगेरी)
उपविजेता : रोनक गवस (बेळगाव)
बेस्ट पोझर : उमेश गंगणे (बेळगाव)
ही स्पर्धा राज्यातील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंना मोठे व्यासपीठ मिळवून देणारी ठरली.
