बेळगाव (प्रतिनिधी) बेळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १४ वर्षांखालील मुलं-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय अथलेटिक्स संघ निवड चाचणी व स्पर्धा नेहरू नगर येथील जिल्हा क्रीडांगणावर उत्साहात पार पडली. या निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेतून एकूण १० खेळाडूंची राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून ते ६ ते ८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान बेंगळुरू येथील श्री कंटेरवा स्टेडियम मध्ये बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
🏆 निवड झालेल्या खेळाडूंची यादी:
- मुलांमध्ये:
- समक्ष कुंभार – 100मी., 200मी.
- सक्षम कुंभार – 100मी., 200मी., 4×100मी. रिले
- विराज कुगजी – 400मी., 4×100मी. रिले
- अनोज हंनगोजी – 400मी., 600मी., 4×100मी. रिले
- प्रार्थ कंनबरकर – थाळी फेक
- मुलींमध्ये:
- जोस्तना हंजिरकर – 100मी., 200मी., 4×100मी. रिले
- माधुरी पाटील – 200मी., 400मी., 4×100मी. रिले
- स्नेहल नाईक – 600मी., 4×100मी. रिले
- समीक्षा कर्तसरकर – 200मी., 400मी., 4×100मी. रिले
- सेजल धामणेकर – लांब उडी, उंच उडी, 4×100मी. रिले
- राखीव म्हणून – ऋतुजा जाधव (भाला फेक)
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष संभाजी देसाई, सचिव अशोक शिंत्रे, क्रीडा भारती कर्नाटक प्रांत सहकार्यवाह विश्वास पवार उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सचिव डॉ. मधुकर देसाई यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात अशोक शिंत्रे यांनी स्पर्धेची प्रस्तावना व माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात किरण जाधव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. उमेश बेळगुंदकर यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेचे पंच म्हणून शिरीष सांबरेकर, महेश मोरे, अनंत पाटील, सूरज पाटील, वैभव गडकरी, आकाश लाड, मयुरी पिंगट आणि ऐश्वर्या नेसरकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या शेवटी विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
उत्कृष्ट धावपटू म्हणून मुलांमध्ये सक्षम कुंभार आणि मुलींमध्ये माधुरी पाटील यांना विशेष चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
✨ बेळगाव जिल्ह्याचे या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असून राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
