सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी रवाना

सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी रवाना

बातमी:
बेळगाव : मुंबईतील गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या दिरंगाईविरोधात श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगारांकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने यावेळीही श्रमिक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे यासाठी ७ मार्च रोजी बेळगाव तालुक्यातील बोडकेनहट्टी येथे जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर सिमाभागातील विविध गावांमधील गिरणी कामगारांनी मुंबईकडे प्रस्थान केले आहे.

चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर तसेच चंदगड तालुक्यातील कुर्णी, गुजवडे, कोवाड, सतेवाडी, अडकूर आदी गावांमधील गिरणी कामगार मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी रवाना झाले आहेत.

यावेळी मनोहर हुंदरे, शिवाजी हुंदरे, दरशथ घाटगे, संजीव कुमार, अतुल दिघे, केदारी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!