मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून

बेळगाव : मराठा मंदिर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत येत्या १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच विविध संघटनात्मक व समकालीन विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची घोषणा करण्यात आली. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या आणि प्रत्येक मराठी माणसासाठी स्वराज्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या किल्ले रायगडावरून, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी – प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे.

२६ जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा गौरव करण्याचा दिवस आहे. मात्र, याच संविधानाची सीमाभागात कर्नाटक सरकारकडून गेल्या ७० वर्षांपासून पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, या अन्यायाविरोधात मराठी सन्मान यात्रेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२ जानेवारी रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत मराठी सन्मान यात्रेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी दि. २० जानेवारी २०२६ पर्यंत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी पुढील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत —
कार्याध्यक्ष धनंजय पाटील : ७८९९०९४१०८
सरचिटणीस मनोहर हुंदरे : ९९४५३४६६४०
उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर : ९७४१२८९८०६

या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर यांच्यासह अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, सागर सांगावकर, अभिजीत मजुकर, इंद्रजीत धामणेकर, सुधीर शिरोळे, रमेश माळवी, सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 7 =

error: Content is protected !!