येळ्ळूरमध्ये मराठी सन्मान यात्रेची पहिली जाहीर सभा; अभिनेते नंदकुमार गोरूले यांचे भाषण

येळ्ळूरमध्ये मराठी सन्मान यात्रेची पहिली जाहीर सभा; अभिनेते नंदकुमार गोरूले यांचे भाषण

बेळगाव:
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेची पहिली जाहीर सभा रविवार (दि. १५ मार्च) रोजी सायंकाळी ७.३० वाजता येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकात होणार आहे. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते, लेखक आणि शिवसैनिक नंदकुमार गोरूले यांचे भाषण होणार आहे.

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात दुपारी ४ वाजता राजहंसगड येथून होणार असून त्यानंतर सुळगे (येळ्ळूर), अवचारहट्टी, देवगण हट्टी, मांसगौंड हट्टी, ब्रह्मदेव हट्टी आणि धामणे या मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली पुन्हा येळ्ळूर येथे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते नंदकुमार गोरूले उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अॅड. एम. जी. पाटील, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच गोपाळराव पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माय मराठीच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मराठी सन्मान यात्रेत सर्व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 3 =

error: Content is protected !!