मराठा युवक संघाच्या विसाव्या भव्य आंतरराज्य अंतरशाळा व आंतरकॉलेज जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

मराठा युवक संघाच्या विसाव्या भव्य आंतरराज्य अंतरशाळा व आंतरकॉलेज जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर मराठा युवक संघ, आबा स्पोर्ट क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसाव्या भव्य आंतरराज्य अंतरशाळा व आंतरकॉलेज जलतरण स्पर्धेला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली.

या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक रवी साळुंखे उपस्थित होते. यावेळी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंदकल, अर्बन बँकेचे संचालक श्रीकांत देसाई, मराठा बँकेचे शेखर हांडे, बेकर्स संचालक शिवाजीराव हंगीरगेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, सुहास किल्लेकर, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलभत्ते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, ज्योती पवार, विजया शिरसाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शेखर हंडे यांनी केले तर जलतरण तलावाची पूजा बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते पार पडली. श्रीकांत देसाई यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.

या प्रसंगी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी गेल्या वीस वर्षांपासून संघाच्या पुढाकाराने जलतरण स्पर्धा कशा प्रकारे भरवल्या जातात याचा आढावा घेतला. पूर्वी या स्पर्धा किल्ल्याच्या तलावात आयोजित केल्या जात, मात्र तेथील पाणी दूषित झाल्यानंतर मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महानगरपालिकेच्या जलतरण तलावात या स्पर्धा सुरू करण्यात आल्या. या उपक्रमातून अनेक नामवंत जलतरणपटू घडल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी चंद्रकांत गुंदकल यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + fifteen =

error: Content is protected !!