वडगाव विभागात मराठा समाजाची बैठक पार पडली

वडगाव विभागात मराठा समाजाची बैठक पार पडली

वडगाव : कर्नाटक सरकारने प्रस्तावित केलेल्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण 2025 मध्ये मराठा समाजाने आपली नोंद योग्य प्रकारे व्हावी यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाच्या वतीने जनजागृती बैठक गणेश मंदिर, संभाजीनगर वडगाव येथे पार पडली.

या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. यावेळी जयराम हलगेकर यांनी जनगणना करताना धर्म – हिंदू, जात – मराठा, पोटजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा स्पष्ट उल्लेख करावा, असे आवाहन केले. तसेच जातीनिहाय जनगणनेतील फॉर्ममधील 60 कलमांची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांनी जनगणतीवेळी प्रत्येक मराठा बांधवाने पोटजात कुणबी अशी नोंद करण्याचे आवाहन केले. तसेच समाजाने पक्षभेद बाजूला ठेवून सकल मराठा समाज म्हणून एकत्रित येणे गरजेचे असून तेव्हाच समाज सबळ बनेल, असे त्या म्हणाल्या.

बैठकीदरम्यान शिवानी पाटील, प्रतिभा सडेकर, उमेश पाटील, अमोल देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीला भाऊसाहेब पाटील, विद्या दळवी, नीता पाटील यांच्यासह मंगाई भजनी मंडळ अध्यक्षा रेणुका पाटील, उपाध्यक्ष नीता चंदगडकर, खजिनदार विजयालक्ष्मी बगाडे, वैशाली जाधव तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

👉 ही बैठक माहितीपर व जनजागृतीपर ठरली असून आगामी सर्वेक्षणात मराठा समाजाने योग्य नोंद करावी असा ठराविक संदेश या बैठकीतून देण्यात आला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =

error: Content is protected !!