मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर दमदार चमक

मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर दमदार चमक

बेळगाव : शहरातील मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचा लौकिक देशभर उजळवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ओपन नॅशनल कराटे स्पर्धेत देशभरातील तब्बल ६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रासह नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्यांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला.

या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील बेकिनकेरे व अगसगा भागातील कराटेपटूंनी विशेष यश संपादन केले. सुमित पुंडलिक खादरवाडकर, विनायक शिवाजी येळ्ळूरकर, सत्यम मोहन पवार, सुमित परसराम गावडे, आदित्य कृष्णा सातेरी, संदेश संतोष मोरे, सुदर्शन कल्लाप्पा लट्टी आणि कार्तिक आपया बगनाळ या सर्व खेळाडूंनी पदकांची कमाई करत राष्ट्रीय स्तरावर बेळगावचा झेंडा उंचावला.

या यशाबद्दल मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमीचे प्रशिक्षक व व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धांसाठी अधिक जोमाने तयारी करण्याचे आवाहन केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + thirteen =

error: Content is protected !!