शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव – पाईपलाईन रोड, विजयनगर येथील शिवगिरी शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वाजता रुद्राभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होणार असून सकाळी ११.३० वाजल्यापासून महारुद्राभिषेकाला प्रारंभ होणार आहे.

यावेळी उपस्थित भक्तांना फळांच्या रसाचा अभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महारुद्राभिषेक सुरू झाल्यानंतर उपवासाच्या पदार्थांचे वाटपही करण्यात येणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक श्री. पी. सी. कोकितकर यांनी केले आहे.

रात्री १२ वाजता नामस्मरण व यामपूजेचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − twelve =

error: Content is protected !!