नवी दिल्ली : महाराष्ट्र–कर्नाटक सीमा वादावरील खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात विनंती करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील श्री. वैद्यनाथन आणि advocate on record श्री. शिवाजीराव जाधव यांनी ही विनंती न्यायालयात मांडली. यावर माननीय न्यायमूर्ती संजीवकुमार आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
त्या दिवशी या प्रकरणातील मूळ दाव्याचीच सुनावणी सुरू होणार असल्याचं कळत असून, त्यामुळे या ऐतिहासिक प्रकरणाची लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे सीमा भागातील जनतेमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे, कारण दशकांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्यावर आता गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.
