महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ : माध्यमिक व महाविद्यालयीन गटांचे निकाल जाहीर

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ : माध्यमिक व महाविद्यालयीन गटांचे निकाल जाहीर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ ही दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंदिर व तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सीमाभागासह महाराष्ट्रातील विविध भागांतील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचे माध्यमिक व महाविद्यालयीन गटांचे निकाल आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.

माध्यमिक गटात प्रथम क्रमांक वेदांत रवींद्र वीर (इयत्ता ९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (इयत्ता ९ वी, महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर) यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक वैदेही विनायक पाटील (इयत्ता ९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) हिने मिळवला. चतुर्थ क्रमांक विभागून श्रिया नारायण पाटील, साईराज राम गुरव (दोघेही इयत्ता ९ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) तसेच समृद्धी विनायक येळवे (इयत्ता ८ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी मिळवला. पाचवा क्रमांक हर्ष गावडू पाटील (इयत्ता ८ वी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी पटकावला. सहावा क्रमांक विभागून प्रेरणा विजय पाटील (इयत्ता ९ वी) व जिज्ञेश रवींद्र गुरव (इयत्ता ८ वी) दोघेही मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी मिळवला. सातवा क्रमांक विभागून जयदिप शि. खेमणाकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर), परम भावकू पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव), भूषण गोविंद मुतकेकर (गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल, इदलहोंड ता. खानापूर) व अजिंक्य अमित देसाई (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी मिळवला. आठवा क्रमांक विभागून मनाली सुभाष बराटे व गणेश राजू बेन्नाळकर (दोघेही मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांनी पटकावला. नववा क्रमांक प्रणव प्रशांत वंदुरे-पाटील (इंग्लिश मीडियम स्कूल, मन्सापुर, खानापूर) यांनी तर दहावा क्रमांक रुचा रवी गोडसे (उषाताई गोगटे हायस्कूल, बेळगाव) हिने मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी श्रावणी राजेंद्र नायकोजी, वेदांत नवनाथ ठोंबरे, संस्कार प्रवीण कुगजी, स्मितल विठ्ठल बडसकर, ऋषिकेश न. महागावकर व मिथिला मंगेश पाटील यांची निवड करण्यात आली.

महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक रुपेश वैजनाथ पाटील (एम.बी.ए., एम.आय.टी., पुणे) यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक साक्षी परशराम गोरल (बेळगाव) यांनी तर तृतीय क्रमांक विभागून आकाश मारुती पाटील व किरण शामराव भोंडवे (के. डी. एस. पी. कॉलेज, नाशिक) यांनी पटकावला. चतुर्थ क्रमांक जगन्नाथ मारुती कुंडेकर (बेळगाव) यांनी मिळवला. पाचवा क्रमांक रोहित हरिबा खन्नूकर (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज) यांनी तर सहावा क्रमांक मिलिंद पाटील (बेळगाव) यांनी पटकावला. सातवा क्रमांक विभागून प्रथमेश सुभाष चांदीलकर (पी.यु.सी., मराठा मंडळ कॉलेज), ज्योतिबा बबन चौगुले (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, बेळगाव) व यश तारीहाळकर (जैन इंजिनिअरिंग कॉलेज, बेळगाव) यांनी मिळवला. आठवा क्रमांक विभागून साक्षी पांडुरंग गुरव (बी.एड., सी.टी.ई. कॉलेज, बेळगाव) व सुरज पाटील (बेळगाव) यांनी पटकावला. नववा क्रमांक सौम्या तानाजी पाखरे (बेळगाव) यांनी तर दहावा क्रमांक श्रेया सुभाष चांदीलकर (जैन इंजिनिअरिंग कॉलेज) हिने मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक सानिका सदाशिव कांबळे (B.Sc., बेळगाव) हिला देण्यात आले.

या सर्व विजयी स्पर्धकांचे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, बक्षीस वितरण समारंभ मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दिनांक १ मार्च २०२६ रोजी मराठा मंदिर कार्यालय, बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − eight =

error: Content is protected !!