बेळगाव सीमोल्लंघन विजयादशमी तयारीला सुरुवात

बेळगाव सीमोल्लंघन विजयादशमी तयारीला सुरुवात

बेळगाव : येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतन मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक सीमोल्लंघन विजयादशमी कार्यक्रमाची तयारीला सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या विजयादशमी सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण लाभणार असून मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महामंडळाच्या प्रयत्नांतून कार्यक्रमाचे वेगळ्या स्वरूपात आयोजन होणार आहे.

तयारीचा आढावा घेण्यासाठी मैदानावर दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर यांच्यासह लक्ष्मण किल्लेकर, श्रीनाथ पवार, ज्योतिबा धामणकर, मनोज काकतकर, ओंकार पाटील आणि मनोज अंगडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बेळगावकरांच्या उत्साहात भर घालणारा हा विजयादशमी सोहळा यंदा नव्या दमदार स्वरूपात पार पडणार असून शहरवासीयांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 🚩✨

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − four =

error: Content is protected !!