लोकसभा अचारसंहिता भंग प्रकरणी समिती नेत्यांना जामीन

लोकसभा अचारसंहिता भंग प्रकरणी समिती नेत्यांना जामीन

बेळगाव : लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीदरम्यान परवानगीपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती आणि विनापरवाना बैलगाडीची फेरी काढण्यात आल्याचा ठपका ठेवून कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125, 127 तसेच भारतीय दंड संहिता कलम 505 अंतर्गत महादेव पाटील यांच्यासह समिती नेते शुभम शेळके, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर व सरिता पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी पाचव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर व तितक्याच रकमेच्या जामिनावर समिती नेत्यांना जामीन मंजूर केला. तसेच भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडणार नाही, या अटीवर जामिनास मान्यता देण्यात आली.

या खटल्यात समिती नेत्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, रिचमन रिकी व वैभव कुट्रे यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे आणि प्रकाश गडकरी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 10 =

error: Content is protected !!