1 लाख लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव महानगर पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता अटक

1 लाख लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव महानगर पाणीपुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता अटक

बेळगाव : पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात येणाऱ्या धनादेशासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव महानगर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांना कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी अटक केली आहे.

रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथील यासिन पेंढारी यांच्या मालकीची 14 गुंठे जमीन मुघळखोड आणि हारूगेरी नगरांसाठी अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा योजनेसाठी सरकारतर्फे अधिग्रहित करण्यात आली होती. या जमिनीचा 18 लाख रुपयांचा मोबदला मंजूर झाला होता. मात्र, या रकमेसाठीचा धनादेश मंजूर करून देण्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक निरंजन पाटील यांनी 17 ऑक्टोबर रोजी कर्नाटक लोकायुक्त बेळगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (क्र. 16/2025, कलम 7(a)) दाखल करून तपास सुरू केला होता.

माननीय श्री. हनमंतराय, पोलीस अधीक्षक, कर्नाटक लोकायुक्त, बेळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आज 27 ऑक्टोबर रोजी तपास अधिकारी निरंजन पाटील यांनी आपल्या पथकासह कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांना त्यांच्या कार्यालयातून अटक केली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंदगौडा पाटील तसेच कर्मचारी रवी मावरकर, गिरीश, शशिधर, सुरेश आणि मल्लिकार्जुन थैकार यांनी सहभाग नोंदवला.

👉 खेमलापूरच्या यासिन पेंढारी यांच्या तक्रारीनंतर झालेल्या या कारवाईने बेळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 6 =

error: Content is protected !!