बेळगाव – गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मद्य विक्रीवर तात्पुरती बंदीचे आदेश जारी केले आहेत.
सदर आदेशानुसार दिनांक 26 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 28 ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत मद्य विक्री पूर्णपणे बंद राहील. यानंतर विसर्जनाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा 5 सप्टेंबर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते 8 सप्टेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे.
ही बंदी बेळगाव शहर आणि तालुका परिसरात लागू करण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.