शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी लीला (आक्का) देसाई यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी लीला (आक्का) देसाई यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी लीला (आक्का) देसाई यांचे निधन

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यातील अग्रणी व्यक्तिमत्व दिवंगत भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी श्रीमती लीला दाजीबा देसाई (वय 99) यांचे आज दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या, दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

लीला देसाई (आक्का) या दिवंगत खासदार दाजीबा देसाई यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यात खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. साराबंदीच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला होता. भूमिगत कार्यकर्त्यांसाठी त्यांनी स्वतः भोजनाची आणि निवासाची व्यवस्था करून लढ्यात हातभार लावला. सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांशी त्यांची निष्ठा आयुष्यभर कायम राहिली.

भाई व्ही. एस. पाटील यांच्या कन्या असलेल्या आक्का या बी.ए. पदवीधर होत्या. त्यांना गुरुवर्य शामराव देसाई, मामासाहेब लाड, शाहीर बहिर्जी शिरोळकर, बहिर्जी ओऊळकर यांसारख्या सत्यशोधक व शेकाप नेत्यांचा सहवास लाभला होता. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.

आक्का उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यांनी साकारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एम्ब्रॉयडरी केलेला फोटो आणि रवींद्रनाथ टागोरांचे जिवंत भासणारे चित्र यांसह त्यांच्या अनेक कलाकृती आजही सर्वांना प्रेरणा देतात. ज्योती कॉलेजच्या स्थापनेत आणि विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले.

त्यांच्या पश्चात चिरंजीव दीपक, सून व नातवंडे असा परिवार आहे. लीला (आक्का) देसाई यांच्या निधनाने समाज, शैक्षणिक क्षेत्र आणि सीमालढ्यातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

error: Content is protected !!