गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने AI चा शिक्षणातील वापर व परिणाम विषयावर व्याख्यानाचे आयोजन

गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने AI चा शिक्षणातील वापर व परिणाम विषयावर व्याख्यानाचे आयोजन

गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या व्याख्यानमालेअंतर्गत “AI चा शिक्षणातील वापर व परिणाम, भविष्यातील संधी” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात होणार आहे.

या व्याख्यानासाठी व्हीटीयूचे प्राध्यापक प्रशांत ढोपे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंबेवाडी येथील रहिवासी असलेल्या प्रा. ढोपे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यांनी जी.एस.एस. कॉलेजमधून पीयूसी पूर्ण केले असून के.एल.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई पदवी सुवर्णपदकासह संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी व्हीटीयू येथून एम.टेक पूर्ण केले असून सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयावर पीएचडी संशोधन करत आहेत. सध्या ते व्हीटीयूमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून विविध कार्यशाळा व करिअर मार्गदर्शन सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

सध्याचे युग हे AI क्रांतीचे युग मानले जात असून शिक्षणासह सर्वच क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडत आहेत. या पार्श्वभूमीवर AI चा वापर करून अध्यापन अधिक प्रभावी कसे करता येईल, तसेच त्यातील मर्यादा व संभाव्य धोके कोणते आहेत, याबाबत प्रा. ढोपे मार्गदर्शन करणार आहेत.

या व्याख्यानाचा लाभ बेळगाव परिसरातील शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

error: Content is protected !!