लहानग्यांच्या लेमोनेड स्टॉलने वेधले लक्ष; ३ वर्षांच्या निहिराने जिंकली सर्वांची मने

लहानग्यांच्या लेमोनेड स्टॉलने वेधले लक्ष; ३ वर्षांच्या निहिराने जिंकली सर्वांची मने

बेळगाव: गंगाशंकर अपार्टमेंटमधील लहान मुलांनी सुरू केलेल्या लेमोनेड स्टॉलला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमाने परिसरात विशेष आकर्षण निर्माण केले आहे.

या स्टॉलमध्ये सहभागी असलेल्या निहिरा घाटगे, निनाद मिसाळे, आर्यन कुमाशीकर, केतन सूर्यवंशी आणि प्रत्युष सामंत या मुलांनी स्वतःच्या उत्साहातून हा उपक्रम उभारला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ३ वर्षांच्या निहिरा घाटगे हिने आपल्या निरागसतेने आणि उत्साहाने सर्वांची मने जिंकली असून ती या स्टॉलचे मुख्य आकर्षण ठरली आहे.

दरम्यान, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, वेंकटेश सर्नोबत, एसबीआय लाइफचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विशाल बागी तसेच परिसरातील काही नागरिकांनी स्टॉलला भेट देत मुलांचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

या उपक्रमामुळे लहान वयातच मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सर्जनशीलता वाढत असल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांकडून या प्रयत्नाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 3 =

error: Content is protected !!