1956 भाषांवर प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन छेडण्यात आले होते, या मध्ये महाराष्ट्र मुंबईसह सीमाभागात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले होते, त्या पैकीच खानापूरचे हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने स्टेशन रोड हुतात्मा स्मारक खानापूर येथे कै. नागाप्पा होसुरकर यांच्या प्रतिमेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मालार्पण करून सर्व उपस्थितांच्या समवेत श्रद्धांजली वाहण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले.
सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली गोपाळ देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, तर सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करूया असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले. तर धनंजय पाटील यांनी सीमाप्रश्न ही नेहरूंची चूक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमाप्रश्न सोडवावा असे आवाहन केले.
सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून महाराष्ट्राने तात्काळ लक्ष देऊन सीमाप्रश्न केंद्रात न्यावा असे विलासराव बेळगावकर म्हणाले.
आबासाहेब दळवी यांनी खानापूर तालुक्यातील जनतेने समितीच्याच झेंड्याखाली एकसंघ व्हावे व समितीला बळकटी द्यावी असे आवाहन केले.
यावेळी सीमाचळवळ आणि सीमाप्रश्न व हुतात्मे या संदर्भात माजी सभापती श्री. मारूतीराव परमेकर, बाळासाहेब शेलार, चंद्रकांत देसाई, पांडुरंग सावंत, रणजित पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील,निरंजन सरदेसाई, माजी जि. पं. सदस्य श्री. विलास बेळगांवकर,
पुंडलिक कारलगेकर, जयराम देसाई, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, विवेक गिरी, मुकुंद पाटील, जयवंत पाटील, संभाजी देसाई, दत्तू कुट्रे यांची अभिवादनपर भाषणे केली.
यावेळी म. ए. समिती नेते श्री. प्रकाश चव्हाण, खजिनदार श्री. संजीव पाटील, नंदगड विभागाचे उपाध्यक्ष श्री. रमेश धबाले, गर्लगुंजी विभागाचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा कुंभार, खानापूर शहर उपाध्यक्ष श्री. मारूती गुरव, श्री. अमृत शेलार, माजी ता. पं. सदस्य श्री. पांडुरंग सावंत, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य श्री. शामराव पाटील चन्नेवाडी, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य श्री. अजित पाटील, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री. गोपाळराव पाटील, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य श्री. रुक्माणा झुंजवाडकर, ॲड. केशव कळ्ळेकर, श्री. मर्याप्पा पाटील, श्री. गणपती पाटील, श्री. विजयसिंह रजपूत, श्री. मुकुंद पाटील, श्री. डी. एम. भोसले गुरूजी यांसह अनेक कार्यकर्ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले.
