खादरवाडी येथे श्री जय हनुमान तालीमच्या मैदानाबाबत बैठक; 12 एप्रिल रोजी कुस्ती मैदान

खादरवाडी येथे श्री जय हनुमान तालीमच्या मैदानाबाबत बैठक; 12 एप्रिल रोजी कुस्ती मैदान

बेळगाव : खादरवाडी येथे श्री जय हनुमान तालीम कुस्तीगीर संघटना खादरवाडी व समस्त गावकऱ्यांच्या वतीने बुधवार दिनांक 11/03/2026 रोजी महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार रविवार दिनांक 12/04/2026 रोजी खादरवाडी येथे कुस्तीचे मैदान भरवण्यात येणार आहे. परिसरातील तसेच बाहेरील इच्छुक पैलवानांनी आणि कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मैदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीस संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राहुल शिवणगेकर, मनोज पींगट, सुधीर डोळेकर, चांगदेव पाटील, गजानन पींगट, नेताजी पींगट, राजू पींगट, दया नेसरकर, ओमकार कडलीकर, भरमा नेसरकर आणि प्रसाद पींगट यांचा समावेश होता.

कुस्ती मैदानाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आयोजकांनी कळविले आहे.

संपर्क :
9019485022
6361718395

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

error: Content is protected !!