आगीत घर जळालेल्या स्वाती कुंभार यांना दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टकडून मदत

आगीत घर जळालेल्या स्वाती कुंभार यांना दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टकडून मदत

बेळगाव:
सिंगिनकोप येथे राहणाऱ्या स्वाती संतोष कुंभार हिचे कौलारू घर आगीत पूर्णपणे भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यही जळून खाक झाले असून कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने स्वाती कुंभार यांना मदतीचा हात देण्यात आला. ट्रस्टकडून त्यांना आर्थिक सहाय्य तसेच संसारोपयोगी साहित्य देऊन मदत करण्यात आली.

शनिवार (दि. १४) रोजी ही मदत स्वाती कुंभार यांच्या स्वाधीन करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अभय लगडे, रमेश देसुरकर, अविनाश खन्नुकर, प्रसाद बाचोळकर आणि कृष्णा कुंभार उपस्थित होते.

ट्रस्टच्या या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला दिलासा मिळाल्याची भावना परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + three =

error: Content is protected !!