श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात वसुबारस निमित्त गाय-वासरू पूजन
बेळगाव │ श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात वसुबारस निमित्त पारंपरिक रीतीने गाय व वासरू पूजन कार्यक्रम संपन्न झाला. मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या पूजन सोहळ्यात भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी अभिजीत चव्हाण, राजू भातखांडे, अजित जाधव, विवेक पाटील, करण पाटील, महेश सांबरेकर, रोशन नाईक, अनिल मुतकेकर, दौलत जाधव, योगेश देसुरकर, प्रकाश घोरपडे यांसह मंदिरातील सेवेकरी व महिला सेवेकऱ्यांची उपस्थिती होती. पारंपरिक वातावरणात झालेल्या या पूजनाने श्रद्धाळूंमध्ये भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले.
