कंग्राळी खुर्द येथे 2 डिसेंबरपासून भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धाविजेत्यास रु. 51,111 तर उपविजेत्यास रु. 25,555

कंग्राळी खुर्द येथे 2 डिसेंबरपासून भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धाविजेत्यास रु. 51,111 तर उपविजेत्यास रु. 25,555

कंग्राळी खुर्द : ग्रामदैवत श्री मसणाई देवी यात्रेनिमित्त मराठा साम्राज्य स्पोर्ट क्लबतर्फे भव्य हाफपीच कै. बी. आय. पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा २ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आली आहे. गेली २० वर्षे सातत्याने होत असलेली ही लोकप्रिय स्पर्धा यंदाही मराठी शाळेच्या आवारात डे-नाईट पद्धतीने रंगणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला रु. 51,111/- रोख रक्कम व चषक, तर उपविजेत्या संघाला रु. 25,555/- रोख रक्कम व चषक असे आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. मुख्य बक्षिसांव्यतिरिक्त मालिकावीराला चांदीची चेन, लॉकेट व चषक तर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांना चांदीची नाणी व चषक प्रदान करण्यात येणार आहेत.

उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी सायं. 6 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. सामने 5 षटकांचे असतील.

इच्छुक संघांनी आपली नोंदणी 30 नोव्हेंबर पर्यंत मराठा साम्राज्य स्पोर्ट्स क्लबकडे करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 पुंडलीक पाटील : 8867501675
📞 विनायक तम्माण्णा : 8088082010
📞 अजित पाटील : 9019435318

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 5 =

error: Content is protected !!