बेळगाव : कित्तूर तालुक्यातील कल्लोळी गावाजवळील हजारो एकर जमीन बापूसाहेब इनामदार नामक व्यक्ती हडपत आहे असा आरोप करत कर्नाटक राज्य शेतकरी संघ हरित सेना यांनी आंदोलन पुकारले. बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा चौकात भर पावसामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. स्वातंत्र्य सैनिक संगोळी रायण्णा यांना ब्रिटिशांना पकडून देण्यासाठी इनामदार घराण्याच्या पूर्वजांनी ब्रिटिशांना मदत केली होती त्या बदल्यात त्या भागातील हजारो एकर जमीन ब्रिटिशांनी त्यांना इनाम म्हणून दिली होती सदर जमीन परत मिळवण्यासाठी बापूसाहेब इनामदार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि इनामदार कुटुंबांच्या मध्ये मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इनामदार कुटुंबाने उच्च न्यायालयात सदर प्रकरण दाखल केले आहे.या जमिनीमध्ये शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत असून, याच जमिनीमध्ये शेतकऱ्यांची घरे देखील आहेत तसेच सरकारने या जमिनीमध्ये अनेक जलसंधारणाची कामे केली आहेत याच जमिनीवरील पत्त्यावरून शेतकऱ्यांचे आधार कार्ड मतदान ओळखपत्र यासारख्या कागदपत्र जोडलेली आहेत माजी सभापती कागोड तीमप्पा जमिनीचा सर्व करून यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा अहवाल सरकारला दिला होता.एकंदरीत शेतकऱ्यांनी एक गुंठा जमीन देखील देशद्रोही इनामदार कुटुंबाला देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आणि म्हणून शेतकरी संघटनेनं प्रादेशिक आयुक्तालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, उच्च न्यायालय यांना निवेदन सादर केले.
कल्लोळी येथील हजारो एकर जमीन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे भर पावसात आंदोलन
