बेळगाव : श्री नामदेव दैवकी संस्था, खडेबाजार बेळगाव यांच्या वतीने आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरातील काकड आरतीचा सांगता समारंभ सोमवारी, दिनांक १० नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
पहाटे सहा वाजता काकड आरती, महाअभिषेक, पूजा व महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर काल्याच्या अभंगांनी भक्तिरस अधिक खुलवला. या कार्यक्रमानंतर मंदिर परिसरात 36 दिवस अखंड सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविकांनी उत्साहात सहभाग घेत सांप्रदायिक एकतेच्या वातावरणात काकड आरतीची सांगता झाली.
#Belgav #BedhadakBelgav
