बेळगाव: दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे ‘स्पेक्ट्रम’ व ‘आकार’ या संयुक्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रो. एम. बी. निर्मळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी किरण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. सोनाली कंग्राळकर उपस्थित होत्या.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञानाधारित प्रयोग, मॉडेल्स व विविध कलाकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या प्रयोगांनी विज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित झाले. “विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो विचार करण्याची एक पद्धत आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या या प्रदर्शनाचे मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. या उपक्रमास पालकांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
