‘मित्र शक्ती-२०२५’ संयुक्त लष्करी सरावास बेळगावात प्रारंभ
बेळगाव :
भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती–२०२५’ या सरावाचा अकरावा आवृत्तीचा शुभारंभ आज बेळगाव येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे झाला. हा सराव १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे.
भारतीय तुकडीमध्ये सुमारे १७० जवानांचा समावेश असून त्यात प्रामुख्याने राजपुत रेजिमेंटचे सैनिक सहभागी झाले आहेत. तर श्रीलंकन तुकडीमध्ये १३५ जवानांचा समावेश असून त्यात गजाबा रेजिमेंटचे सैनिक प्रमुख आहेत. याशिवाय भारतीय वायुसेनेचे २० आणि श्रीलंकन वायुसेनेचे १० जवानही या सरावात सहभागी आहेत.
या सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या Chapter VII Mandate अंतर्गत Sub-Conventional Operations म्हणजेच दहशतवादविरोधी मोहिमांदरम्यान संयुक्त कारवाईची तयारी आणि समन्वय साधणे हा आहे. या सरावात रेड, सर्च अँड डिस्टroy मिशन, हेलिबोर्न ऑपरेशन्ससह विविध युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येतील. तसेच आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन (AMAR), कॉम्बॅट रिफ्लेक्स शूटिंग आणि योगा यांचाही समावेश सरावात करण्यात आला आहे.
या सरावात ड्रोन, काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टिम्स आणि हेलिकॉप्टरच्या वापरावरही भर दिला जाणार आहे. तसेच हेलिपॅड सुरक्षा, कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन (जखमी जवानांची सुरक्षित सुटका) यांसारख्या कृतींचा संयुक्त सराव दोन्ही देशांच्या सैन्यांकडून केला जाईल.
या सरावाद्वारे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर समन्वय, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण, आणि संयुक्त मोहिमांदरम्यान जीवितहानी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ होण्यास आणि प्रादेशिक शांतता टिकवण्यासाठी ‘मित्र शक्ती–२०२५’ हा सराव महत्त्वाचा ठरणार आहे.
#Belgav #BedhadakBelgav
