पंचमसाली आरक्षण आंदोलन प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची चौकशी सुरू

पंचमसाली आरक्षण आंदोलन प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची चौकशी सुरू

बेळगाव (प्रतिनिधी):
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (धारवाड खंडपीठ) आदेशानुसार पंचमसाली समाजाच्या 2A आरक्षण आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचे अध्यक्षपद निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बन्निकट्टी हनमंतप्पा आर. यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

हा आयोग कर्नाटक सरकारने नियुक्त केला असून, 10 डिसेंबर 2024 रोजी बेळगावच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान घडलेल्या घटनांची सखोल चौकशी या आयोगाकडून सुरू आहे. 18 ऑगस्ट 2025 पासून सुवर्ण विधानसौध, बेळगाव येथे साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले असून, आतापर्यंत सुमारे 74 बाधित व जखमी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

सार्वजनिक सूचनेनुसार, साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र (sworn statement) नोंदविण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे ज्यांना या घटनेबाबत मौखिक किंवा कागदोपत्री पुरावे सादर करायचे आहेत, त्यांनी 15 ऑक्टोबरपूर्वी सुवर्ण विधानसौधच्या दुसऱ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 219 मध्ये सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोगाच्या वतीने नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, चौकशी पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने पार पडावी यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे निवृत्त न्यायाधीश बन्निकट्टी हनमंतप्पा आर. यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + twenty =

error: Content is protected !!