५ व्या आंतर महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेत संगोळी रायण्णा व आरपीडी विजेते

५ व्या आंतर महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेत संगोळी रायण्णा व आरपीडी विजेते


बेळगावला अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान देण्याचे खासदार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन

बेळगाव :
बेळगावमधून हॉकी खेळाने देशाला अनेक ऑलिम्पिकवीर दिले आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये अत्याधुनिक अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदान उभारण्याचे स्वप्न माझ्या कार्यकिर्दीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले.

हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या आंतर महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळाप्पा होसमणी होते. प्रारंभी त्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.

या आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत मुलांच्या गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने आरपीडी महाविद्यालयावर २–० अशी मात करून विजेतेपद पटकावले. तर मुलींच्या गटात आरपीडी महाविद्यालयाने संगोळी रायण्णा महाविद्यालयावर १–० असा विजय मिळवून विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटात आरपीडी महाविद्यालय उपविजेते ठरले, तर मुलींच्या गटात संगोळी रायण्णा महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळवले.

स्पर्धेत संगोळी रायण्णा महाविद्यालयाचा शुभम नाईक आणि आरपीडी महाविद्यालयाची नेत्रा गुरव यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तसेच सायली पाटील आणि सावनी गोडबोले यांची उगवते खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

स्पर्धेतील विजयी संघांना प्रमुख पाहुणे खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक हरिविजय मच्छलवार आणि कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत स्पर्धेची माहिती दिली. विजयी संघांसाठी मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्व. आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ चषक पुरस्कृत करण्यात आले होते.

यावेळी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रकाश चाळके, सुरेश पोटे, दयानंद कारेकर, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, डॉ. मल्लिकार्जुन थाल्ला, संतोष दरेकर, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 9 =

error: Content is protected !!