तोपिनकट्टी /
श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास तोपिनकट्टी परिसरातील देशाचे आजी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी सुरेश देसाई होते.
यावेळी सर्व सैनिकांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विशेषतः शेंदूर लढाईत भाग घेतलेल्या वीर सैनिकांचा सन्मान करून त्यांना अभिवादन करण्यात आले. माजी सैनिक नामदेव गुरव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ माजी सैनिक रामचंद्र हलगेकर यांचीही या सोहळ्यात उपस्थिती विशेष ठरली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुरेश देसाई म्हणाले की, कोणत्याही भाषेचा विरोध न करता आपल्या मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी संघटित राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमास संस्थेचे संचालक शिवाजी गुरव, व्हा. चेअरमन ईराप्पा पाटील, काळेशी बाचोळकर, महादेव गुरव, बसवंत होसुरकर, भरतारी कुंभार, नारायण पाटील, हेडमास्तर आरगुचे, गोरे, नागेंद्र पाटील, होसुरकर L D तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.