बेळगाव (प्रतिनिधी): भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन गोंधळी गल्ली येथील सर्वदा मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. हे पूजन सोसायटीचे संचालक श्री. आनंत पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संचालक श्री. बाबू पावशे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीताच्या गजरात तिरंग्याला मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सचिन पुरोहित, उपाध्यक्ष धनंजय पाटील, संचालक रमेश पाटील, श्रीनाथ बेळवडी, संजय पाटील, चंद्रकांत मेलगे, संतोष अर्कसाली, संचालिका रूपा साखरे, शीतल शंभुचे, सेक्रेटरी मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक राजू मुतकेकर, रूपाली खांडेकर, संगीता कुंडेकर, भरमा बेळगावकर, यल्लप्पा वळतकर, सुनील पाटील, योगेश गौडाडकर यांच्यासह अनेक मान्यवर व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन करून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला.