बेळगाव (प्रतिनिधी) — श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मच्छे यांच्या चक्रपाणी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र, मच्छे तर्फे कै. श्रीमती आनंदीबाई कृष्णा वांद्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित महिला व मुलींसाठीच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ आज शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये बेधडक बेळगाव चे संपादक पियुष हावळ, पंच मुरली मामा जांगळे, डॉ. प्रकाश राजगोळकर, नगरसेविका नेत्रावती भागवत, समाजसेवक विनोद भागवत व अॅड. सचिन शिवणवर तसेच शिवप्रतिष्ठानचे धारकरी अजित जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पियुष हावळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून करण्यात आली. यानंतर डॉ. प्रकाश राजगोळकर यांनी पियुष हावळ यांचा शाल घालून सत्कार केला.
कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.
नगरसेविका नेत्रावती भागवत यांचे मनीषा मोहन वांद्रे यांनी, समाजसेवक विनोद भागवत यांचे दीपक वांद्रे, पंच मुरली मामा जांगळे यांचे कृष्णा नाईक, अजित जाधव यांचे महादेव कणबरकर, डॉ. प्रकाश राजगोळकर यांचे विजय हलगेकर तर अॅड. सचिन शिवणवर यांचे प्रवीण चंदगडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मच्छे व चक्रपाणी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र मच्छे चे सचिन चोपडे दादा यांचा बाळू सांगूकर यांनी शाल घालून सत्कार केला.
तसेच साक्षी पाटील यांचा प्रज्ञा पेडणेकर, संदीप पाटील यांचा राम कटारे, नागराज लाड यांचा योगेश पेडणेकर, पृथ्वीराज सुळगेकर यांचा महादेव कणबरकर, संपदा बेळगावकर यांचा दया कटारे आणि श्रेया बेळगावकर यांचा निकिता उसूलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी लहान मुले व मुलींनी प्रशिक्षणात शिकलेल्या युद्धकलेची कर्तबगारी सर्वांसमोर सादर केली. तसेच चक्रपाणी युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या सदस्यांनी प्रगल्भ योद्ध्यांसाठी आवश्यक असलेली प्रात्यक्षिके सादर करून युद्धकलेचा गाभा कसा असतो हे प्रभावीपणे दाखवून दिले.
सोबत सचिन चोपडे यांनी युद्धकलेचे शिक्षण, त्यातील शिस्त, आणि आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
या वेळी प्रमुख पाहुणे पियुष हावळ यांनी दीपक वांद्रे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे मुलींमध्ये आत्मसंरक्षणाची भावना तर वाढेलच, पण सोबतच सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणाही मिळेल. समाज घडविणाऱ्या येणाऱ्या पिढीला संस्कार आणि आत्मविश्वास देण्यात या उपक्रमाचे मोठे योगदान आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
सामर्थ्य महिला मंडळ तर्फे स्वागत स्मिता राजगोळकर आणि महादेवी हम्पन्नवर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता उसूलकर आणि नितीन महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन महाले यांनी मानले.
या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी महिलांनी आणि युवतींनी आत्मसंरक्षणासाठी युद्धकला शिकणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत चक्रपाणी प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
