बेळगाव : पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा युवक मंडळाच्या वतीने होळी व रंगपंचमी उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन पंच कमिटी व कार्यकारी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा होळीचा सण सोमवार दिनांक २ मार्च २०२६ रोजी रात्री ठीक १० वाजता होळी आणण्याचा व पळवण्याचा कार्यक्रमाने सुरू होणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ठीक ५.३० वाजता होळी व होळी धनाची पूजा करण्यात येणार आहे.
यावर्षी चंद्रग्रहण असल्याने इतर धार्मिक कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. लोटांगण कार्यक्रम सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत गणपती मंदिर येथून सुरू करण्यात येईल. तसेच देवालयाची पूजा ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार असून, त्यानंतर श्रीफळ वाडविण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सर्व भक्तांनी तसेच बेळगावातील नागरिकांनी या वेळापत्रकाची नोंद घेऊन उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
